बेदेंवाडीच्या शेतकऱ्यांप्रमाणे इतर शेतकरी समृध्दी महामार्गास जमीनी देतील:- विभागीय आयुक्त: डॉ. पुरुषोत्तम भापकर

0
695
Google search engine
Google search engine

औरंगाबाद-

 

राज्यात होऊ घातल्याले समृध्दी महामार्गासाठी औरंगाबाद तालुक्यातील बेदेंवाडी गावातील दोन शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आहे.इतर गावातील शेतकरी सुध्दा लवकरच स्वत:होऊन आपली जमिनी देतील.असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज व्यक्त केला. 
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित समृध्दी महामार्गांसंदर्भात दस्त हस्तांतरण कार्यक्रमाच्या वेळी डॉ. भापकर बोलत होते. या वेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे अपर जिल्हाधिकारी जगदिश मिनीयार, उपजिल्हाधिकारी एम.व्ही. आरगुडे, पुर्नवसन विभागाचे उपायुक्त महेंद्र हरपाळकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार श्री.सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भापकर म्हणाले की, बेदेंवाडी, ( ता.औरंगाबाद ) येथील शेतकरी शामराव रुंजाजी हिवराळे आणि सर्जेराव येडूबा शेजवळ या दोन शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गासाठी आपली जमीन विक्री करुन हातभार लावला आहे. खऱ्याअर्थांने या प्रकल्पास सुरुवात झाली असून हळूहळू चित्रबदलणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांचा जास्तीतजास्त फायदा कसा होईल यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियामुळे समृध्दी महामार्गाच्या कामाला गती मिळणार असून शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करावे. प्रशासन त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आवाहनही डॉ. भापकर यांनी यावेळी केले..
बेदेंवाडी गावातील शेतकरी श्री. हिवराळे यांनी समृध्दी महामार्गसाठी आपली 75 गुंठे जमीन शासनास दिली असून त्यांना त्यामोबदल्यात 68लाख,78हजार,624 रुपये तर श्री. शेजवळ यांनी 23 गुंठे जमीन दिली असून त्यांना 11लाख,88हजार,138 रूपये मोबदला मिळाला आहे. ही रक्कम आरटीजीएस द्वारे त्यांच्या बँक खात्यात शासनातर्फे जमा करण्यात आली आहे. या संदर्भातील जमिनींचे खरेदी खत त्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सुपूर्त केले.
उपजिल्हाधिकारी एम.व्ही. आरगुडे यांनी या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करून अन्य शेतकाऱ्यांनीसुध्द या प्रकल्पासाठी आपली जमीन देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात या महामार्गाची लांबी 112.30 कि.मी. असून जिल्ह्यातून 62 गावातून हा रस्ता जात आहे. जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाच्या कामास गती मिळत असून शेतकऱ्यांचा विरोध मावळतांना दिसत आहे. जिल्हयातील 62 गावातील, 552 शेतकाऱ्यांनी, समृध्दी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाला आपली जमीन विक्री करण्यासाठी सहमती दिली आहे, अशी माहिती श्री. आरगुडे यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाला एम एस आरडीसी, महसूल विभागाचे कर्मचारी आणि बेदें गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.