सामाजिक संकेतस्थळांवरील हिंदु धर्मावरील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘भारत नीती’कडून ‘ऑनलाईन हिंदुत्व योद्धा’ दल उभारण्याची योजना

0
695

वाराणसी –

 

हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांचे रक्षण आणि प्रसार करण्यासाठी ‘भारत नीती’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने शहरात नोव्हेंबर मासात ‘ऑनलाईन हिंदुत्व योद्धा’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

‘भारत नीती’चे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य श्री. शैलेंद्र सेंगर म्हणाले, ‘‘सामाजिक संकेतस्थळांवरून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणे, हे आता नित्याचेच झाले आहे. आपल्या देवतांची निंदानालस्ती रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याविषयी या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे’’ हिंदुद्वेष्ट्यांकडून हिंदु धर्म आणि देवता यांची विटंबना रोखणे आणि हिंदु धर्माचे रक्षण करणे, या उद्देशाने समर्पित तरुणांचे ‘ऑनलाईन हिंदुत्व योद्धा’दल उभारण्याची योजना संघटनेने सिद्ध केली आहे.