राष्ट्र-धर्म यांसाठी त्याग करणार्‍या सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र म्हणजेच हिंदु राष्ट्र ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

0
707
Google search engine
Google search engine

पनवेल –

 

अखिल मानवजातीला मोक्षप्राप्ती करून देणारा हिंदु धर्म टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याविना पर्याय नाही. स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करणे हिंदु राष्ट्रातच शक्य होईल. राष्ट्र-धर्म यांसाठी त्याग करणार्‍या सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र म्हणजेच हिंदु राष्ट्र होय, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. येथील कृष्ण भारती सभागृहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. आरंभी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कृतीप्रवण करणार्‍या या कार्यशाळेचा उद्देश श्री. नरेंद्र सुर्वे यांनी सांगितला. यानंतर कार्य करतांना साधना होण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत, याविषयी सनातन संस्थेच्या सौ. अर्पिता पाठक यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील ४२ युवा कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाची ध्वनिचित्रचकती प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आली.

राष्ट्ररक्षण, हिंदूसंघटन, धर्मजागृती यांसाठी समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची ओळख या कार्यशाळेत करून देण्यात आली. कार्यशाळेत स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग, प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग, धर्मजागृती सभा आणि सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु राष्ट्राविषयी जागृती या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.

क्षणचित्र : सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी भ्रमणभाषवरून उपस्थितांना मार्गदर्शन केले.