आ.बच्चु कडू यांच्या आंदोलनाची  दखल – राज्यातील रखडलेली तूर खरेदी तात्काळ सूरू होणार ! 

0
692
Google search engine
Google search engine

अमरावती/ विशेष प्रतिनिधी/-


शासन आदेश निर्गमित

तुर खरेदी केंन्द्रावरील राज्यातील ३१ मे २०१७ पर्यतची टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी तात्काळ सूरू करण्याचे आदेश सहकार व पनण वस्र उद्योग मंत्रालयाने आज दिले . आमदार बच्चु कडू यांनी तूर खरेदी प्रकरणी तात्काळ  निर्णय न घेतल्यास  राज्यातील सर्व पालकमंत्र्याच्या घरात २२ जुलै रोजी तूर फेकण्याचा  इशारा दिला होता .या आंदोलनाची दखल घेऊन आज अखेर शासनाने नमती घेत रखडलेली तूर खरेदी तात्काळ सूरू करण्याचे व ही सर्व तूर ३१ जुलै पर्यंत  खरेदी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्याना दिले  आहेत . रखडलेल्या तूर खरेदीच्या या आदेशामूळे राज्यातील लाखो हेक्टर तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

या आदेशानंतर तुर खरेदी बाबत २२ जुलै रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आ. कडू यांनी दिली आहे.
राज्यातील तुर खरेदी केंन्द्रावरील ३१ मे २०१७ पर्यतच्या टोकन दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी बाबत शासनाने नकाराची भूमिका घेतल्याने  तूर उत्पादक  शेतकरी विवंचनेत अडकले होते . याबाबत प्रहार  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चु कडू यांच्या कडे शेतकऱ्यांनी तूर खरेदी बाबत न्याय देण्याची मागणी केली होती . या मागणीच्या अनूषंगाने आ.बच्चु कडू यांनी २१ जुलै पर्यंत तुर खरेदी बाबत निर्णय न झाल्यास २२ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेली तूर पालकमंत्र्यांच्या घरात भरणार असल्याचा इशारा राज्य शासनास दिला होता. या  सबधीचे पत्र आमदार कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना दिले होते. या आंदोलनाचा धसका घेत अखेर आज  सहकार पणन व वस्त्रोउद्योग मंत्रालयाच्या वतीने राज्यातील टोकन दिलेल्या  सर्व शेतकऱ्यांची तूर राज्य शासनाने  बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत ३१ जुलै पर्यंत खरेदी करून  तसा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज ( दि.२१ रोजी ) देण्यात आले आहेत . राज्यातील हजारो तूर उत्पादक  शेतकऱ्यांना या आदेशाने मोठा दिलासा मिळाला आहे . आमदार बच्चु कडू  यांच्या  प्रयत्नांनी अखेर तुर उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळाला असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठे पाठबळ या निर्णयाने मिळाले आहे .

या निर्णया बाबत राज्यातील तुर उत्पादक शेतकर्यांनी आमदार बच्चू कडू यांचे आभार व्यक्त केले आहे.