एकता कपूर यांचा “लिपस्टिक्स अंडर माय बुरखा” चित्रपट लवकरच प्रदर्शित

0
964

अनिल चौधरी – पुणे :-

 

आंत्रप्रिन्युअर्स ऑर्गनायझेशनने (ईओ) प्रसिद्ध चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्या व यशस्वी उद्योजक एकता कपूर यांचे पुण्यातील कॉरनॅड येथे यजमानपद भूषविले. एकता कपूर यांनी ईओ च्या सदस्यांशी बोलताना त्यांचा महिला उद्योजक म्हणून झालेला प्रवास उलगडण्याबरोबरच, भारतीय माध्यम व्यवसायातील यशाबद्दलही गप्पा मारल्या. या उद्योजकीय प्रवासामध्ये आलेल्या चढ-उतारांबद्दलही तिने ईओ च्या पुण्यातील सदस्यांशी चर्चा केली.

एकता कपूर ही तिच्या आगामी “लिपस्टिक्स अंडर माय बुरखा” या चित्रपटाबद्दल बोलताना खूपच उत्साही होती. शिवाय, एक मजबूत सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाच्या निवडीबद्दलही ती बोलली. या वादग्रस्त चित्रपटाच्या, पॅन इंडिया वितरणासाठी ती या मंडळावर प्रेझेंटर म्हणून निवडली गेल्यापासूनच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तिने कसलीही कसर बाकी ठेवलेली नाही. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठाच संघर्ष करावा लागला आहे. चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा यांनीही हे मान्य केले आहे की, केवळ एकता कपूरच या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकते.

अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, आहाना कुमरा आणि प्लबिता बोरठाकूर यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चार महिला दैनंदिन जीवनातील मर्यादांमधून, थोडेसे स्वातंत्र्य जणू चोरण्याचा प्रयत्न करत असतात. हा चित्रपट दि. २१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाला मिळालेल्या नकारात्मकतेमुळे एकता कपूर ही संपूर्णपणे शांत आणि स्थिरचित्त आहे. “मला इतरांनी जे सांगितलं तेच जर मी केले असते तर मी आत्ता जे करु शकते त्याच्या अर्धेही मला करता आले नसते. कदाचित हा चित्रपट चालेल किंवा नाही चालणार. पण,या आशेवरच आपण जगत असतो. मी या शक्यतांसाठीच जगते. मला खरोखरच मनापासूनच जे हवे आहे, ते हेच की, हा चित्रपट चांगला चालला पाहिजे…” ती म्हणाली.

एकता कपूर ही कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कधीही बाहेर पडलेली नाही. मात्र, हा चित्रपट स्वतःचा नसूनही ती त्याच्या प्रमोशनमध्ये अत्यंत रुची दाखवित आहे. ती म्हणते की, बऱ्याच काळानंतर असा चित्रपट आला आहे, जो धाडसी आणि प्रश्न उपस्थित करणारा असण्याबरोबच, मनोरंजकही आहे. एकता कपूरशी चर्चा करून आणि तिच्या गप्पांचे यजमानपद भूषवून आंत्रप्रिन्युअर्स ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना एक फलदायी अनुभव मिळाला.

 

ईओ ग्लोबल आणि ईओ पुणे बद्दल –

 

आंत्रप्रिन्युअर्स ऑर्गनायझेशन, पुणे, हा आंत्रप्रिन्युअर्स ऑर्गनायझेशन ग्लोबलचा एक भाग आहे, जे फक्त उद्योजकांसाठी असलेले वैश्विक नेटवर्क आहे. ईओ हे आघाडीच्या उद्योजकांना एकमेकांकडून शिकण्यासाठी मदत करण्याबरोबरच, तज्ज्ञांशी संवाद आणि आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. जागतिक स्तरावर ईओ चे सुमारे ५० देशात पसरलेल्या १६० चाप्टर्सचे १२,००० सदस्य आहेत. ईओचे हे सदस्यत्व फक्त निमंत्रितांसाठीच असते. सदस्य म्हणून पात्र होण्यासाठी, १ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीचे संस्थापक, सहसंस्थापक, मालक किंवा नियंत्रित भागधारक असावे लागते.

 

ईओ दक्षिण आशियामधील १३ वा चाप्टर म्हणून ईओ पुणेची स्थापना २३ जुलै २०१३ रोजी झाली, तो पुणेकरांसाठी एक अभिमानास्पद क्षण होता. २८ सदस्यांसह सुरुवात झालेल्या ईओचे आता पुण्यात ६० आंत्रप्रिन्युअर्स सदस्य आहेत. ईओ पुणे चे सदस्य हे ऑटोमोबाइल, रियल

इस्टेट, सॉफ्टवेअर, एज्युकेशन,फूड आणि

बेव्हरेजेस, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, एंटरटेनमेंट,फायनान्स, कमोडिटीज इत्यादी विविध क्षेत्रांमधील आहेत. ईओ पुणे च्या सदस्यांचे सरासरी वय ४२ वर्षे आहे.

सर्व ईओ पुणे सदस्यांच्या व्यवसायातील विक्रीची आकडेवारी एकत्र केली तर ती एकूण ३ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी असून, ते सुमारे १७,००० हून अधिक लोकांना रोजगार पुरवितात.

ईओ चा मुख्य उद्दीष्ट हे एकमेकांसोबत शिकण्याबरोबरच बाहेरील स्त्रोतांकडून शिकणे असे आहे.

ईओ पुणे येथे व्याख्यान दिलेल्या मान्यवर वक्त्यांमध्ये, यांचा समावेश आहे –  सुब्रमण्यम स्वामी, अनुपम खेर, सुहेल सेठ,सुभाष देसाई,राजेंद्र दर्डा, बोम्मन इराणी, अनु आगा, स्कॉट बॉर्नस्टिन, अॅलन मिंटझ्, राजदीप सरदेसाई, गुरचरण दास आणि इतर.