चांदुर रेल्वे स्टेट बँकेचा गलथान कारभार – सोमवारी 34 मिनीटे उशीरा सुरू झाले कामकाज

0
669
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) 

देशातील अग्रगण्य बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया सद्यस्थितीत सर्वश्रेष्ठ बँक ठरली असली तरी चांदुर रेल्वे शहरातील स्टेट बँकेचा गलथान कारभार पुढे आला आहे. सोमवारी तब्बल 34 मिनीटे बँकेचा कारभार उशिरा सुरू झाला असुन एवढ्या वेळापर्यंत ग्राहकांना विनाकारण लाईनमध्ये टोकन घ्यासाठी उभे राहावे लागले.
सविस्तर माहितीनुसार, स्थानिक धनराज नगरस्थित भारतीय स्टेट बँकेच्या कामकाजाची वेळ 10.30 ते 4.30 वाजतापर्यंत आहे. मात्र शहरातील या बँकेचे कामकाज दररोज 15 मिनीटे उशिरा सुरू होते. आणि सोमवारी तर तब्बल 34 मिनीटे उशिरा बँकेचा कामकाज सुरू झाले. 11 वाजुन 3 मिनीटांनी ग्राहकांना टोकन देणे सुरू होऊन 11 वाजुन 4 मिनीटांनी काऊंटर सुरू झाले. स्टेट बँकेने ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणुन टोकन सिस्टीम सुरू केली. या टोकन सिस्टीमची संपुर्ण व्यवस्था 10.30 वाजतापर्यंतच होणे जरूरी आहे. मात्र या टोकन सिस्टीममुळे कामकाज सुरू व्हायला दररोज उशिर होत आहे.  आणि सोमवारी तर थेट 34 मीनीटे उशिर झाल्यामुळे ग्राहकांत संतापाची लाट दिसत होती. तसेच काही कर्मचारी सुध्दा सोमवारी 10 ते 15 मिनीटे उशिरा आले. तालुक्यातील बँकेच्या ग्राहकांची सर्वांत जास्त गर्दी स्टेट बँकेत असल्यामुळे बँक प्रशासनाने कामकाज वेळेवर सुरू करणे गरेजेचे आहे. मात्र प्रशासनाचा गलथान कारभार पुढे आला आहे. त्यामुळे आता स्टेट बँकेने टोकन सिस्टीमची पुर्वतयारी करून सकाळी 10.30 वाजता कामकाज सुरू करावे अशी मागणी ग्राहक करीत आहे.

नवीन खाते उघडायला लागतो 1 महिना

याच स्टेट बँकेत नवीन खाते उघडायला 1 महिन्याचा कालावधी लागत आहे. यामुळे नवीन खाते उघडणाऱ्यांनाही जास्त विचार करावा लागत आहे. कारण शहरातील इतर राष्ट्रीयकृत बँकेत जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसांतच नवीन खाते उघडुन मिळते. त्यामुळे स्टेट बँकेतच एक महिना का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.