राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री अरुण देशपांडे यांचा परभणी दौरा

0
815
Google search engine
Google search engine

परभणी- राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे (मंत्रीस्तरीय) अध्यक्ष श्री अरुण देशपांडे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.17 डिसेंबर 2017 रोजी औरंगाबाद येथून वाहनाने रात्री 8 वाजता परभणी येथे आगमन आणि विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 1.30 वाजता अखिल भारतीय ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठासंबंधी अधिकारी यांच्या समवेत ग्राहक संरक्षण या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व चर्चा. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अन्न सुरक्षा कायद्यासंबंधी सर्व पुरवठा निरीक्षक, पुरवठासंबंधीत तहसीलदारांच्या समवेत बैठक व चर्चा.सायंकाळी 6 वाजता परभणी येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.