*अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी*

0
554
Google search engine
Google search engine

अंबाजोगाई : येथून जवळच असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका बसचा चालकाचा मृत्यू झाला तर ३० पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले. जखमीत महिला आणि बालकांचा समावेश आहे.

गंगाखेड – पुणे आणि लातूर – परभणी या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात लातूर – परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.