20 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत चालणार विदर्भातील सर्वात मोठी बहिरम यात्रा महोत्सव -मंदिराचे बांधकाम आणि यात्रेची तयारी अंतिम टप्यात

0
1304
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार:-बादल डकरे –

संपूर्ण विदर्भाचे लक्ष्य वेधून घेणारी आणि तब्बल सव्वा महिना चालणाऱ्या तसेच विदर्भातील सर्वात मोठी यात्रा समजली जाणारी बहिरम यात्रेला दिनांक 20 डिसेंबर ला सुरुवात होणार असून याची समाप्ती 31 जानेवारी ला होणार असल्याची माहिती बहिरम बाबा संस्थान अध्यक्ष देविदास राव चौधरी यांनी विदर्भ 24 न्यूज शी बोलताना दिली.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश च्या दोनी राज्याच्या सीमेलगत असलेले ही यात्रा कडाक्याच्या थंडी मध्ये भरत असल्याने या यात्रेचा आनंद अधिकच दुगुणीत होत असल्याचे चित्र आहे.पूर्वी या यात्रेत भरपूर असे कार्यक्रम होत होते.अनेक दुकाने येत असत त्यामध्ये बैलजोडी च्या साहित्य तसेच शेती उपयोगी साहित्य देखील या यात्रेमध्ये येत होते.मात्र काळानुरूप यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा चा दिवस आल्याने सर्वात जास्त प्रमाणात गर्दी या दिवशी पाहायला मिळते.या दिवशी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते.

खरे पाहतां बहिरम यात्रा कालभैरवस्तकम या प्राचीन नावाने सुद्धा ओळखली जाते.तसेच या यात्रेला खंडोबा यात्रा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अशी माहिती चौधरी यांनी विदर्भ 24 न्युज ला दिली.

या यात्रे मधील मटणाची हंडी,आणि भाकरी ही फार प्रसिद्ध पावली आहे त्यामुळे ज्यांना ते आवडते ते याच स्वाद घेण्यासाठी बहिरम ला येत असतात.तसेच पूर्वी बहिरम बाबा समोर बळी देण्याची प्रथा होती मात्र आता ती बंद करण्यात आली आहे.आदिवासी बांधव या यात्रेत मोठ्या प्रमाणात असतात.आपले मागितले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बळी दिली जात होती.तसेच या यात्रेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणाकरिता रोडगे असतात.त्यामुळे ही यात्रा सर्वात मोठी आणि चविदर यात्रा आहे.

बहिरम बाबा मंदिर संस्थान मंदिरातील गणपती मंदिराच्या मागच्या बाजूला तलाव आहे. या तलावातून पुरातन काली स्वयंपाक करण्यासाठी भांडी निघत होती.आपले काम झाल्यानंतर ती भांडी परत त्या तलावात टाकली की ते गायब होत होती अशी पुरातन दंत कथा आहे.