हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी जागृत व्हावे ! – त्रिविक्रम रावजी, हिंदु जागरण मंच, गुजरात

0
1036
Google search engine
Google search engine

वडोदरा (गुजरात) येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर कार्यशाळा

वडोदरा (गुजरात) – हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जागरण मंचचे प्रमुख श्री. त्रिविक्रम रावजी यांनी येथे केले.

मंचच्या वतीने येथील श्री स्वामीनारायण मंदिर कारेलिबाग, वडोदरा येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस सुप्रसिद्ध अधिवक्ता नीरज जैन उपस्थित होते. या कार्यशाळेस हिंदु जनजागृती समितीलाही निमंत्रित करण्यात आले होते.

श्री. रावजी पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंमध्ये भेद निर्माण करून भारतीय कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोमाता आणि गंगामाता यांचा अवमान करून हिंदु संस्कृतीवर घाला घातला जात आहे. धर्मावरील अशा आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध केला पाहिजे.’’ या कार्यक्रमाचा अधिवक्त्यांसह १५० हिंदूंनी लाभ घेतला.

क्षणचित्र

हिंदु जागरण मंचच्या वतीने हिंदु जनजागृती समितीला कार्यक्रमस्थळी प्रदर्शन लावण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्याप्रमाणे समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती करणारे फलक आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.