‘बारायण’ मध्ये दिग्गज कलाकारांची फौज – १२ जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

0
846
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी, पुणे:-
विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक संदेश न देता पालकांसह संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर ‘बारायण’ च्या अँथम सॉंग मधून प्रेक्षकांना मिळाले आहे. पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या ‘बारायण’ या चित्रपटात अतिशय बोलका चेहरा आणि निरागस भाव असलेला अनुराग वरळीकर हा हरहुन्नरी अभिनेता मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’च्या  ‘बारायण’ या मराठी चित्रपटात अनुराग वरळीकर याच्यासह बाबांच्या भूमिकेत अभिनेते नंदू माधव, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा – संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहे.  गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना; संगीतकार पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.