देशातील एकाही चित्रपटगृहात पद्मावती प्रदर्शित होऊ देणार नाही !- पू. भिडेगुरुजी @RAJPUTVIRBHARAT @beenaba5 @RajputWorldNews

0
609
Google search engine
Google search engine

सांगली – राणी पद्मावतीच्या जोहराच्या ज्वालेमध्ये चित्रपट दाखवणारे शिल्लक रहाणार नाहीत. केवळ सांगली येथेच नाही, तर देशातील एकाही चित्रपटगृहात पद्मावती प्रर्दशित होऊ देणार नाही, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दिली. पद्मावती चित्रपटाच्या विरोधात २ डिसेंबर या दिवशी येथे काढलेल्या भव्य वाहनफेरीच्या वेळी ते बोलत होते. या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.