*शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विभागनिहाय कृती आराखडा आवश्यक.- आ.डॉ.श्री अनिल बोन्डे*

0
1150
Google search engine
Google search engine

नागपूर :

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आवाहन केले आहे, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी विभागनिहाय प्रत्यक्षात कृती करण्याची नितांत गरज आहे असे उदगार मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोन्डे यांनी काढले.

केंद्रीय निंबुवर्गीय फळ अनुसंधान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सी.डी. मायी हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात आयसीएआर गीताने झाली. त्यानंतर दीप प्रजलन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉ.एम.एस.लदानिया यांनी केले. याप्रसंगी सर्वश्री डॉ.एस.के.सिंह, गिरीश गांधी व माजी मंत्री सुनीलबाबा शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या एक दिवशीय चर्चासत्राला संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातून शेतकरी व शेती उत्पादक, मार्गदर्शक तथा शास्त्रज्ञ बहुसंख्येने उपस्थित होते.