साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनी येथे युवती वर चाकूने हल्ला

0
1017

अमरावती :-

आज अमरावती शहरातील नामांकित साई नगर भागातील वृंदावन कॉलोनी मध्ये श्री साई मंदिर मधून आपल्या मैत्रिणी सोबत दर्शन घेऊन स्कुटी पेप्ट मोपेड ने वापस येत असताना तिचा कथित प्रेमी ने ज्याचे नाव राहुल भड आहे त्याने मुलीचा गळ्यावर चाकू मारून भरदिवसा तिचा खून केल्याची धक्कादायक घटना आज घडली.दोघांमध्ये मागील 5 ते 6 महिन्यापासून वाद विवाद सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे याबाबत गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये 2 तर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये 2 तर राजपेठ पोलीस स्टेशन मध्ये 1 तक्रार दाखल झाली होती . मरण पावलेल्या युवतीने कालच सदर तरुणाबद्दल फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आरोपी राहुल भड

सोशल मीडिया मध्ये फेसबुक खात्यात दोघांचे हार घातलेले फोटो टाकलेले आहे ते फोटो सदर युवक तिचा परिचयाचा लोकांना पाठवीत असे याबाबत देखील एक तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात केली गेली होती . मरण पावलेल्या युवतीचे पूर्ण नाव प्रतीक्षा मधुकरराव मेहत्रे (22 वर्ष) असे आहे