दापोरी येथे लोक कला यात्रेला हजारो गावकऱ्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसाद ! – आसाम, तेलंगणा, छत्तीसगढ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यातील १०० कलावंतांनी केली कला सादर

0
995
Google search engine
Google search engine

दापोरी येथील नागरिकांनी अनुभवली लोक कलेची रंगत !

रुपेश वाळके / मोर्शी –

लोक नृत्य कलाकारांच्या रंगारंग या विशेष कार्यक्रमातून मोर्शी तालुक्यातील नागरिकांना संपूर्ण देशातील विविध संस्कृतींचे ओळख करवून दिली गेली .लुप्त होत चाललेल्या भारतीय आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन नागरिकांना व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन दापोरी येथे करण्यात आले होते .

मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे संस्कृती मंत्रालय ,भारत सरकार व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कला यात्रा, विविध राज्यातील लोक नृत्य कलाकारांचा रंगारंग कार्यक्रन दापोरी येथील लालदास स्वामी विद्यालयाच्या प्रांगणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला . बरदोई शिखला, आसाम , बोनालु तेलंगणा , लावणी नृत्य महाराष्ट्र , गेडी नृत्य छत्तीसगढ , गुदुमबाजा मध्यप्रदेश , पोवाडा गायन , आणि वग या क्रमाने वगनाट्याचे होणारे सादरीकरण, भारुड आणि गोंधळातून दिले जाणारे सामाजिक धडे, दापोरी येथील नागरिकांनी ‘लोककला यात्रेच्या माध्यमातून अनुभवला .

पाश्चात्य संगीताच्या वावटळीत लोकसंगीत गडप होत चालले आहे. नव्या पिढीलाही लोकसंगीताचे महत्त्व कळावे, त्यातील भावार्थ समजावा, या उद्देशाने ‘महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार , तर्फे लोक कला यात्रेचे दापोरी येथे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

मोर्शी तालुक्यात लोक कला यात्रा लोक नृत्य कलाकारांचा रंगारंग कार्यक्रम सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम मोर्शी , शिरखेड , खेड येथे झाला असून कार्यक्रमाचा समारोप दापोरी येथे करण्यात आला . यावेळी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा, लोककला, ग्रामीण जीवनाचे दर्शन दापोरी येथील नागरिकांना घेता आले.

लोक कला यात्रा कार्यक्रमाची सुरुवात पोवाडा व गणेश वदनाने झाली. त्यानंतर छत्तीसगढी नृत्य , बरडोई शिखला आसाम नृत्य , लावणी यासह मराठी मातीतल्या एकाहून एक अस्सल गीतांचा नजराणा पेश करत लोककलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावेळी दापोरी परिसरातील हजारो नागरिक व युवक उपस्थित होते .