चाळीसगाव वृत्तपत्रकार मित्र मंडळाने केला पोलीसांचा सत्कार <●> पत्रकार बांधवांनी केलेला सत्कार हा आमच्या दैनदिन कामात नविन ऊर्जा मिळणारा – पो.नि  श्री गाडे पाटील

0
709
Google search engine
Google search engine

चाळीसगाव (विशेष प्रतिनिधी )

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व डीबी चे कर्मचारी यांनी घरफोडीचा गुन्हा, अंबुजा कंपनीतील चोरी तसेच हिरापूर रोडवरील देवरे दांपत्याच्या खुनातील आरोपीला अटक करुन तीन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला व यातील पोलीस निरीक्षक व ५ पोलीस कर्मचा-यांचा पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सत्कार करुन प्रशस्तिपत्र दिल्याबद्दल चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या वतीने चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक गाडे पाटील, स पो नि राजेंद्र रसेडे व कर्मचारी यांचा नुकताच पोलीस स्टेशनला पुष्पगुछ व शाल देवुन सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव सह भडगाव व कजगाव येथे जवळपास २४ घरफोड्या व दुकान फोडणा-या तसेच एम आय डी सी मधील अंबुजा कंपनी मध्ये चोरी करणा-या आरोपींना शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, डीबी चे हवालदार शशिकांत पाटील, पो कॉ बापु पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, गोपाल भोई यांनी तपास करुन मोठ्या शिताफीने आरोपींना मुद्देमाला अटक केली होती तसेच हिरापुर रोडवरील देवरे दांपत्याच्या खुनातील आरोपींना पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी चे हवालदार बापु भोसले, पो कॉ गोवर्धन बोरसे, संदीप जगताप, गोपाल बेलदार यांनी अटक केली होती म्हणुन जळगाव पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील व हवालदार शशिकांत पाटील, पो कॉ बापु पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, गोपाल भोई यांना प्रशस्तिपत्र देवुन त्यांचा सत्कार केला होता. यासाठी चाळीसगाव वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या वातीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, एम बी पाटील, रमेश जानराव, मोतीलाल अहिरे, सुर्यकांत कदम, आजीज खाटीक, गणेश पाटील, उमेश बर्गे, शरद पाटील, अनिल शिरसाठ विशाल कारडा आदी पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चाळीसगाव तालूका पत्रकार मित्र मंडळाने पोलीसांच्या कामांची दखल घेऊन आमचा सत्कार करून आम्हाला सन्मानित केले सत्कार अनेक होतात परंतू पत्रकार बंधुनी केलेला हा सत्कार हा आम्हाला नविन कामांची उभारी व ऊर्जा निर्मान ठरेल असे प्रतिपादन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख पो नि गाडे पाटील यांनी सत्काराला ऊतर देतांना आपले विचार मांडले. चाळीसगावच्या पत्रकार मित्र मंडळाने पोलीसांच्या चागल्या कामगिरीचे कौतूक केले व जेस्ट पत्रकार सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोरर्वेकर यांच्या हस्ते पी आय गाडे पाटील यांचा शाल पूष्पहार देऊन सत्कार केला पारंभी पत्रकार मित्र मंडळाचे सचिव एम बी पाटील यांनी आपले विचार मांडले त्या नंतर डी बी पथकातील पोलीस मित्रांचे पूष्प गूच्छ देऊन सन्मानीत करण्यात या प्रसंगी पत्रकार एम बी पाटील, रमेश जानराव,सूर्यकांत कदम, गणेश पाटील, अजीज खाटीक, मोतीलाल अहीरे, सी सी वाणी ,ऊमेश बर्गे, अनील शिरसाठ, अजीज खाटीक, शरद पाटील, विशाल कारडा व पत्रकार बांधव मोठ्या संखेने ऊपस्थित होते