पद्मावती चित्रपट दाखवला, तर देशातील सर्व चित्रपटगृहे नष्ट करू ! – भाजपचे नेते सुरज पाल अम्मू यांची चेतावणी

0
654
Google search engine
Google search engine

चंडीगड – मी पद्मावती चित्रपट पाहू इच्छित नाही आणि मी अन्य कोणालाही तो पाहू देणार नाही. जर तुम्ही याला गुंडगिरी म्हणत असाल, तर मला काही फरक पडत नाही. जर चित्रपट दाखवलाच गेला, तर तुम्हाला माहिती आहे की, देशात पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत. संपूर्ण क्षत्रिय समाज देशातील सर्व चित्रपटगृहे नष्ट करील, अशी चेतावणी हरियाणातील भाजपचे नेते सूरजपाल अम्मू यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली

सुरज पाल अम्मू पुढे म्हणाले की, या चित्रपटाचे ट्रेलर दूरचित्रवाहिन्यांवर आणि चित्रपटगृहांत दाखवण्यात येत आहेत. यातील दृश्ये पाहून मला लाज वाटते. यापूर्वी सुरज पाल अम्मू यांनी दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणार्‍याला १० कोटी रुपये देण्याचे घोषित केले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासह भाजपनेही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.