करणी सेनेच्या अध्यक्षांना पाकमधून ठार मारण्याची धमकी

0
744
Google search engine
Google search engine

जयपूर – ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध करणारे करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रसिंह कलवी यांना पाकिस्तानमधून दूरभाषवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. करणी सेनेचे राजस्थानातील प्रमुख श्री. महिपालसिंह मकराना यांनाही अशाप्रकारची धमकी देणारा दूरभाष आला आहे. श्री. महिपालसिंह मकराना प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘‘मी आधीपासून सांगत होतो की, ‘पद्मावती’साठी आतंकवाद्यांनी पैसा ओतला आहे. आता त्या आतंकवाद्यांनी आम्हाला धमकी देण्यासही चालू केले आहे.

मला कराची येथून एक दूरभाष आला होता. दूरभाष करणार्‍या व्यक्तीने ‘पद्मावती चित्रपटास विरोध थांबवला नाही, तर करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रसिंह कलवी यांची हत्या करू’ असे सांगितले. तसेच ‘वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटांप्रमाणे देशभर स्फोट घडवू’ अशी धमकीदेखील दिली.’’ ‘पद्मावती’च्या निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची अंमलबजावणी संचलनालय अन् केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याकडून चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.