कसं मिळवाल तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट घरबसल्या PDF स्वरूपात?

0
3359
Google search engine
Google search engine

तुमचे दहावी (SSC) किंवा बारावी (HSC) चं प्रगतीपुस्तक गहाळ झालाय काय? तुमच्या सर्टिफ़िकेटवर डाग पडलेत का? तर नो टेन्शन आम्ही तुम्हाला काही पर्याय देत आहोत. असं असेल तर आता बोर्डाने तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आणली आहे एक खास सुविधा ई-मार्क्सशीटची. तुम्ही तुमच्या मार्कशीटचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासू शकता आणि एक प्रत PDF स्वरूपात साठवून ठेवू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…

१) http://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jspही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडा

२) या साईटवर नाव, फोन नंबर, इमेल आय डी, पासवर्ड टाकून तुमचे खाते बनवा.

३) तुमचे परिक्षेचे वर्ष, परिक्षा क्रमांक, तुम्हाला मिळालेले मार्क भरून तुमचे मार्कशीट मिळवु शकता.