कलानगरीचे नाव सार्थक करणारे राजधानीतील प्रदर्शन : ज्ञानेश्वर मुळे <><> ‘इरॉटीक ऑरगॅनीज्म’ फोटोग्राफी प्रदर्शनीचे उद्घाटन

0
565
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली  –

 

कोल्हापुरचा तरुण फोटोग्राफर शुभम चेचर यांच्या ‘इरॉटीक ऑरगॅनीज्म’ या प्रदर्शनीमुळे कोल्हापुर या कला नगरीचे नाव सार्थक करणारे असे प्रदर्शन राजधानीत बघायला मिळाले अशा असे मत परराष्ट्र व्यवहार सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.

येथील ललीत कला अकादमीच्या कला दालनात कोल्हापूर येथील शुभम चेचर या तरूण फोटोग्राफर च्या ‘इरॉटीक ऑरगॅनीज्म’ या पहिल्या वहील्या फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. मुळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

श्री. मुळे म्हणाले, कोल्हापूर च्या या तरूण कलावंताच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा आजचा योग विशेष आहे. जेडीआर्टच्या चौथ्या वर्षाला शिकत असताना आयुष्यातील पहिले वहीले फोटोग्राफी प्रदर्शन थेट दिल्लीत भरविण्याचे शुभम चेचर यांचे धाडस कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनात चित्रकारी बरोबरच फोटोग्राफी , तंत्रज्ञान आणि शास्त्रीय दृष्टीकोण या सर्वांच अद्वितीय मिश्रण पहायला मिळते. हे प्रदर्शन म्हणजे कोल्हापूर या कला नगरीचे नाव राजधानी दिल्लीत सार्थक करण्याचा यशस्वी प्रयत्न आहे असे श्री. मुळे म्हणाले. त्यांनी या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

शुभम चेचर हा तरूण कलाकार कोल्हापूर येथील प्रसिद्ध दळवीज आर्ट कॉलेज मध्ये जेडी आर्टच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. ‘इरॉटीक ऑरगॅनीज्म’ फोटोग्राफी प्रदर्शनीच्या माध्यमातून आईच्या उदरात भ्रुण निर्माण होण्या पर्यंतच्या विविध अवस्था या ठिकाणी फोटोग्राफ्सच्या माध्यमातून दाखविण्या आल्या आहेत. २२ नोव्हेंबर २०१७ पर्यंत सकाळी ११ ते सायंक ७ वाजे पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले असणार आहे. या प्रदर्शनाच्या समारोपास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत.