पारनेर : लोणीमावळा अत्याचार प्रकरणी तीनजण दोषी

0
1472

प्रतिनिधि – उमेर सय्येद

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे एका शालेय अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2014 राेजी सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधिक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष विष्णू लोणकर, मंगेश दत्तात्रय लोणकर, दत्तात्रय शिंदे (सर्व रा. लोणीमावळा, ता. पारनेर) यांना अटक करण्यात आली होती.

हा तपास स्थानिक पोलीस निरीक्षक यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्रदाखल केले होते. या खटल्यात अँड. श्री उज्ज्वल निकम यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली होती.

आज (दि.6) सोमवारी हा खटला अंतीम टप्प्यात आला आहे. यात तिनही आरोपी दोषी असल्याचे अँड. निकम यांनी सिद्ध केले आहे. या तिघांनाही उद्या शिक्षा ठोठावणार आहे.

त्यामुळे पिडीत मुलीस योग्य न्याय मिळाल्याच्या भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे .