राजना फाट्याजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला अपघात की घातपात ? मोटर सायकल शेजारी पडून

0
1157

चांदूर रेल्वे /  शहेजाद खान  –

 

चांदूर रेल्वे ते वर्धा रस्त्यावर राजना फाट्याजवळ रवीवारी (ता.२९)रात्री १०
वाजता एका अज्ञात इसमाचा मृतदेह पडून असल्याचा आढळला. मृतकाच्या शेजारीच त्याची
स्प्लेंडर दु व्हीलर (एमएच२७जे९१९९) पडून होती. त्यावरून हा अपघात आहे की घातपात
आहे अशी शंका उपस्थित होत आहे.
मृतकाच्या खिशात मिस्त्रीकाम करण्याचा टेप आढळून आल्याने तो मिस्त्रीकाम करीत असावा
असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. सदर प्रकार घातपात वा अपघात
असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.