अभिनेता सलमान खान घरी गणपति आणत असल्याने तो मुसलमान नाही ! – दारुल उलूम

0
607

लक्ष्मणपुरी –

 

अल्लाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देवतेची मुसलमानांनी पूजा किंवा आरती करणे इस्लामच्या विरोधात आहे, असे दारुल उलूम जकारिया मशिदीचे मौलाना मुफ्ती शरीफ खान यांनी म्हटले आहे. अभिनेता सलमाख खान घरी गणपति (श्री गणेशमूर्ती) आणत असेल, तर त्याने मुसलमान म्हणून घेण्याचा अधिकार गमावला आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. त्याच वेळेस चित्रपटांमधून मुसलमान अभिनेते किंवा अभिनेत्री पूजा किंवा आरती करत असतील, तर त्यात अयोग्य काही नाही. तेे दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार केले जाते, असेही मौलाना म्हणाले.