आज सत्कार साहेबांचा पद्मविभूषण श्री शरद पवार यांचा सर्वपक्षीय सत्कार @PawarSpeaks

0
817
Google search engine
Google search engine

अमरावती :-

माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज बिपीएड मैदान येथे सर्व पक्षीय जंगी सत्कार करण्यात येणार असून या सोहळयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय दिग्गज उपस्थित राहणार आहे.
गेल्या काही दिवसापासून सर्व पक्षीय मंडळीनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तसेच पद्मविभूषण शरद पवार यांचा जंगी सत्कार करण्याचे नियोजन आखले होते. सर्व पक्षीयांच्या विनंतीला मान देवून शरद पवारांनी अमरावतीला येण्यास पसंती दर्शविल्यामुळे आज दिनांक २३ ऑक्टोबर रोजी बीपीएड मैदान येथे त्याचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.