रेल्वे प्रशासनाचा पुन्हा चांदुर वासीयांवर अन्याय – काझीपेठ – पुणे गाडीला केवळ चांदुर स्टेशनवरच थांबा नाही

0
870
Google search engine
Google search engine

चांदुर वासीयांमध्ये रोष

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी सुरू दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सुरू झाली. मात्र प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळीही रेल्वे प्रशासनाने चांदुर वासीयांवर अन्याय करीत या गाडीला केवळ चांदुर स्टेशनवर थांबा दिला नसल्यामुळे नागरीकांत रोष व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रेल्वे विभागाने प्रवाशांना दिलेली ही एक मोठी भेट आहे. मात्र या गाडीला चांदुर रेल्वे येथे थांबा नसल्याने या भागातून काहीसा नाराजीचा सूर आलेला आहे. चांदुर रेल्वे येथे महाराष्ट्र एक्स्प्रेस वगळता पुण्याकडे जाणाऱ्या एकाही गाडीचा थांबा नसल्याने येथे थांबा आवश्यक आहे. कारण पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पहिलेच चांदुर रेल्वे शहरात अनेक रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी स्थानिक रेल रोको कृती समिती प्रयत्नरत असुन यासाठी अनेक आंदोलने केली आहे. रेल्वे प्रशासनाला निवेदने, बेशरमचे झाड भेट सुध्दा दिले आहे. हाच पहिलेचा प्रश्न चिघळत असतांना रेल्वे प्रशासनाने काझीपेठ-पुणे या नविन रेल्वे गाडीला थांबा न दिल्यामुळे नागरीकांत रेल्वे प्रशासनाविरोधात पुन्हा चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नागरीक कधी रस्त्यावर उतरतील हे सांगणे कठीण झाले आहे. खासदार रामदास तडस यांनी रेल्वे थांब्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही थांबा मिळालेला नाही. अशातच खा. तडस यांनी काझीपेठ- पुणे या गाडीला थांबा द्या यासाठी रेल्वे प्रशासनाऐवजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पत्र लिहल्याचे समजते. मात्र असे पत्र अनेक रेल्वे मंत्र्यांना लिहुण अद्यापही फायदा झाला नसल्यामुळे या पत्राचा काहीही फायदा होणार नसल्याचे मत काही नागरीकांनी व्यक्त केले. खासदार तडस हे केवळ दाखविण्यापुरते पत्रव्यवहार करीत असुन या कृतीतुन काहीही साध्य नाही होत आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षच करीत असलेल्याने खासदारांना आता कृतीतुन काही करून दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.

खासदार साहेब जागे व्हा अन्यथा घंटानाद आंदोलन करणार !

– रेल रोको कृती समिती  – श्री नितीन गवळी

खासदार रामदास तडस यांच्या विरोधात सुध्दा तालुकावासीयांमध्ये चीड निर्मान झाली आहे. त्यांनी कित्येक महिन्यापासुन चांदुर रेल्वे तालुक्याचा दौरा सुध्दा केलेला नाही. रेल्वे थांब्याचे आश्वासन दिल्यानंतर केवळ पत्रव्यवहारच न करता थेट रेल्वे मंत्रालयात धडक देऊन चांदुर रेल्वेला थांबा लवकरात लवकर मिळवुन द्यावा. अन्यथा चांदु रेल्वे वासीयांचा आवाज खासदारांपर्यंत पोहचविण्यासाठी लवकरच त्यांच्या गावी देवळीला घरासमोर घंटानाद आंदोलन करू असे मत रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांनी व्यक्त मांडले.