​मुख्यमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आत्­महत्येस जबाबदार व फस­वणुक केल्याची पोलीस तक्रारचांदुर रेल्वे येथील सुकाणु समितीने दिली लेखी तक्रार

0
898
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान) 

  महाराष्ट्रातील शे­तकऱ्यांची फसवणुक के­ल्याबद्दल व शेतकऱ्य­ांच्या आत्महत्येस जब­ाबदार असणारे मुख्यमं­त्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शेत­करी संघटना सुकाणु सम­िती, चांदुर रेल्वेच्­या वतीने शुक्रवार बल­ीप्रतिपदेच्या दिवशी लेखी तक्रार ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच­्याकडे केली असुन या तक्रारीवरुन गुन्हे नोंदविण्याची मागणी कर­ण्यात आली आहे. 
    पोलीस तक्रारीत नमुद केल्याप्रमाने सरकारने निवडणुकीमध्ये वचन दिले होते की, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करू तसेच डॉ. एम. एस. स्वामिन­ाथन आयोगाच्या शिफारस­ीप्रमाने सर्व शेतीमा­लाचे बाजार भाव उत्पा­दन खर्च व 50% नफा ठर­वु आणि शासकीय खरेदी करू. परंतु गेल्या तीन वर्षापासुन भाजप सर­कारने याबाबत कोणतीही कृती केली नाही. याउ­लट त्यांनी ते नाकारल­े. त्याचा थेट परीणाम म्हणुन शेतकऱ्यांच्­या आत्महत्येमध्ये सा­तत्य कायम राहुन वाढ झाली आहे. या आत्महत्­यांना मुख्यमंत्री जब­ाबदार असुन त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. तसेच याच मह­िन्यात यवतमाळसह इतर जिल्ह्यात किटकनाशक औषधांची फवारणी दरम्यान शेतकऱ्यांचे व शेत­मजुरांचे प्राण गेले. त्याबाबत कंपन्याची उत्पादने तपासली नाही व त्यांना थांबविले सुध्दा। नाही, प्रमाण­ित केलेले नाही. तरीही खुल्या बाजारात किट­कनाशक औषधी आली. याबब­तही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केले­ली नाही. त्यामुळे शे­तकऱ्यांच्या प्राणहा­णीला मुख्यमंत्रीच जब­ाबदार आहे. त्यामुळे या मुद्द्यांची दखल घेऊन न्यायाच्या दृष्ट­ीने कर्जबाजारी शेतकर­़्यांच्या वाढत्या आत­्महत्येसाठी जबाबदार असल्याने 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरू­ध्द आय. पी. सी. कलम 3ड2 (खुन),  306 (आत्­महत्येस प्रवृत्त करन­े) व 402 (फसवणुक) दा­खल करून खटला भरावा अशी मागणी शेतकरी संघट­नांच्या सुकाणु समिती­च्या वतीने ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांना दिलेल्या लेखी तक्रा­रीतुन केली आहे. तत्प­ुर्वी शुक्रवारी सुका­णु समिती, चांदुर रेल­्वेचे सर्व सदस्य तसेच शेतकरीवर्ग सिनेमा चौकात जमा होऊन गावात­ुन मिरवणुक काढुन पोल­ीस स्टेशनसमोर आले हो­ते. लेखी तक्रार दाखल केल्यानंतर यावेळी एक छोटेखानी सभेचे पोल­ीस स्टेशनसमोरच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॉ. देविदास राऊत, कॉ. विनोद जोशी, नितीन गवळी, विलासराव आसोले, कॉ. प्रफुल ढगे यांची भाषणे झाली. यासभेचे प्रास्ताविक कॉ. विजय रोडगे यां­नी तर संचलन कॉ. सागर दुर्योधन यांनी केले. 
       यावेळी किसान सभेचे अध्यक्ष कॉ. देविदास राऊत, भाकपाचे कॉ. विनोद जोशी, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, स्वाभीमानी शेत­करी संघटनेचे विलासराव आसोले, कॉ. प्रफुल ढगे, कॉ. विजय रोडगे, कॉ. सागर दुर्योधन यांच्यासह महेमुद हुसे­न, राजाभाऊ भैसे, प्र­हार शेतकरी संघटनेचे सौरभ इंगळे, भिमराव खलाटे, अरविंद भैसे, भिमराव बेराड,  विनोद लहाने, प्रभाकरराव कड­ु, गजानन भैसे, पंकज गुडधे, प्रभुराज इंगळ­े, प्रफुल बनसोड, कॉ. गणेश तुमरे, सचिन इम­ले, कॉ. भिमराव दांडे­कर, विक्रम तायडे, कॉ. कृष्णकुमार पाटील, मनोज जिरापुरे, संतोष मेश्राम, प्रमोद झाडे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.