एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच – परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातील बैठकीत तोडगा निघालेला नाही

0
1537

मुंबई:

 

 एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरा बैठक झाली. मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरु होण्याची लागलेली आशा पुन्हा धुसर झाली आहे.

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरुच राहील, अशी माहिती दिली.

संघटनेनं सातवा वेतन आयोग आणि सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करण्यासाठी साडे 4 हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती. तर रावतेंनी 2.57 हजार कोटींचा प्रस्ताव एसटी कर्मचारी संघटनेपुढे ठेवला असून त्याउपर एकही रुपया सरकारडून दिला जाणार नाही, असं म्हटलं आहे.