मंगरुळपिर तालुक्याच्या कन्येची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप – अमेरिकन प्रकाशनाने घेतली शेलुबाजार येथील ‘क्षितीज संस्थेचि दखल

0
1777

मंगरुळपिर /विशेष प्रतिनिधी/-

११ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कन्या दिन म्हणून जगभरात सजारा होतो.परंतु या दिवसाचा पाहिजे तसा गवगवा होत नाही.कुठलेही उपक्रम राबिविल्या जात नाहीत.शक्तीचे प्रतीक असलेल्या देवीची प्रतिस्थापणा करून नऊ दिवस भारतभर नवरात्र उत्सव साजरा केला जातो.परंतु ११ ऑक्टोबर या जागतिक कन्या दिनी कोणी एखाद्या मुलीचा सत्कार केल्याचे उदाहरण नाही. परंतु मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका छोट्याशा गावातील अभियांत्रिकीत उच्च शिक्षीत असलेल्या स्नेहल चौधरी ने मुली व महिलांच्या समस्यासाठी कार्य करण्यासाठी क्षितिज नावाची संस्था स्थापन करून देशातच नव्हे तर थेट अमेरिकेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून मंगरुळपिर तालुक्यासह वाशिम जिल्ह्याच्या मानात तुरा रोविला.

स्नेहल ज्ञानेश्वर चौधरी ही मूळची मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजारची स्नेहल चे प्राथमिक शाळेचे शिक्षण शेलुबाजार येथेच झाले पुढे हायस्कूल चे शिक्षण कारंजा येथे पूर्ण करून यवतमाळ च्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी ची पदवी पूर्ण करून तिने नौकरीकरत शेलुबाजार येथे क्षितिज फाउंडेशन नावाची संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या साठी कार्य सुरू केले. स्नेहलच्या कार्याची दखल देशातील अनेक मान्यवरांनी घेऊन तिच्या कार्याची स्तुती केली. स्नेहल चौधरी ही मुलींची मासिक पाळी व त्यांच्या त्या संदर्भातील समस्या या बाबत कार्य करीत असते. तिने आता पर्यंत महाराष्ट्र च्या कण्याकोपऱ्यात जाऊन मासिक पाळी या संदर्भात मुलींमध्ये जनजागृती केली. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना या बाबत जागृत केले. स्नेहल ने मंगरुळपिर तालुक्यातील गोगरी येथे या संदर्भात नुकताच उपक्रम राबवून येथील शाळकरी मुलींना याबाबत माहिती देऊन तेथे उपक्रम राबविला आणि ११ ऑक्टोबर या कन्या दिनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील “वुमेन अँड गर्ल” या प्रकाशनाने स्नेहल चौधरीने राबविलेल्या गोगरी या छोट्याशा गावातील कार्याची दखल घेऊन व तिला भारताचे प्रतिनिधित्व बहाल केले.न्यूयॉर्क येथील “वूमेन अँड गर्ल” प्रकाशन हे जगभरातील मुली व महिलांच्या समस्या संदर्भात कार्य करीत असते या प्रकाशनाने शेलुबाजार स्तित क्षितिज फाउंडेशन च्या स्नेल चौधरी हिला भारताचे प्रतिनिधित्व देणे ही मंगरुळपिर तालुक्यासह वाशिम जिल्ह्याचे नाव आज आंतरराष्ट्रीय स्थळावर स्नेहल या जिल्ह्याच्या कन्येने पोहचविले. स्नेहल चौधरी हिने तिच्या या यशाचे श्रेय तिचे आई-वडील ज्यांनी तिला या कार्याबाबत प्रोसाहित केले त्यांच्या सह तिच्या चमूतील सदस्य तसेच तिला या कार्यात प्रतक्ष्य व अप्रतक्ष्यरित्या सहकार्य केले त्यांना स्नेहल ने आपल्या या श्रेयात भागीदार असल्याचे सांगितले. ११ ऑक्टोबर या जागतिक कन्या दिनी वाशिम जिह्याला ही सर्वात मोठी भेट असल्याचे बोलल्या जात आहे.