अमरावती येथील रस्ता रोको सुकाणू समिती,प्रहार संघटना,संभाजी ब्रिगेड च्या समावेश

0
1451

अमरावती :-

कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने फसवणुक केल्याने सरकार विरोधात सुकाणु समितीच्या वतीने आज अमरावती येथे रहाटगाव चौफुली येथे राज्य रास्तारोको होते.राज्यातील शेतकर्‍यांनी परिस्थिती अत्यंत हालाकीची असून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्त करावे व त्यांच्या मालाला हमीभाव अधीक ५0 टक्के नफा भाव घोषीत करावा स्वामीनाथ आयोग लागु करावे यासह विविध मागण्या घेवून १ ते ७ जून दरम्यानचा शेतकरी संप शेतकर्‍यांनी यशस्वीरित्या पार पडला. तेव्हा सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन दिले होते. यावरुन आंदोलन काही काळ शांत होते. परंतु सरकारने कर्जमाजीच्या नावाखाली चक्क फसवणुक केली असून जाचक अटीमुळे शेतकर्‍यांना मारणारे आहे. यामुळे आज रस्ता रोको करण्यात आला जवळपास अर्धा तास अमरावती नागपूर हायवे बंद होता इमर्जन्सी रुग्णवाहिका यावेळी सोडण्यात आल्या तब्बल अर्ध्या तासानंतर पोलिसांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना अटक केली.यावेळी काही कार्यकर्त्यांनी अंगातील कपडे काढत सरकारचा निषेध केला खाली मुडके वर पाय करून सुधा निदर्शने केली. यात प्रहार तर्फे छोटू महाराज वसु , श्री प्रदीप वडतकर ,देशमुख इत्यादी उपस्थित होते

 

यावेळी प्रहार शेतकरी संघटना , स्वराज अभियान शेतकरी संघटना , संभाजी ब्रिगेड , शेतकरी संघटना इत्यादींचा समावेश होतो.