संत श्रेष्ट श्री गजानन महाराजांची पालखीचे शेगावात आगमन- लाखो भाविकांची उपस्थिती

0
769
Google search engine
Google search engine

समीर देशमुख  / महेंद्र मिश्रा -शेगाव –

 

 

आषाढी यात्रेनिमित्त शेगाव येथून निघालेल्या संत गजानन महाराज यांचा पालखीचा शेगाव मध्ये आज आगमन झाले. श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ३१ मे रोजी श्रींच्या पालखीचे सकाळी ७ वा. प्रस्थान झाले होते. श्रींची पालखी २ जुलै १७ रोजी आषाढ शु.९ श्री क्षेत्र मंगळवेढा येथून २४ किमीचा प्रवास करीत सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपुरला पोहचली होती . ८ जुलै २०१७ पर्यंत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम होता. तर ९ जुलै आषाढ शु. १५ शेगावसाठी पालखी परतीच्या प्रवासास सुरुवात करण्यात आली. कुर्दवाडी, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाळी, बीड, गेवडाई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बिबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार २९ जुलै खामगाव येथे, तर आज  ३० जुलै रविवार शेगाव येथे  महाराजांचा पालखीच आगमन अतिशय भावपूर्ण वातावरणात झाले. एकूण ५६३ किमीचा प्रवास २२ दिवस पूर्ण करून श्रींची पालखी शेगावात दाखल झाली. www.vidarbha24news.com

श्रींच्या पालखीचे आषाढी यात्रेचे ५० वे वर्ष
श्री संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाकरिता जात असते. या पायदळ वारीत भाविक मोठ्या श्रध्देने सामिल होतात. त्यांची उत्तम व्यवस्था गजानन महाराज संस्थानच्यावतीने केली जाते. या पालखीची शिस्त वाखाणण्याजोगी असते. यावर्षी पालखीचे पंढरपूर यात्रेचे ५० वे वर्ष होते.