‘आप’च्या आमदार अलका लांबा यांच्याकडून ‘हनुमान चालीसा’चे विडंबन

0
634
Google search engine
Google search engine

नवी देहली –

 

आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि देहलीतील आमदार अलका लांबा यांनी ‘ट्विटर’ वर नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवडीवरून  टीका करतांना ‘हनुमान चालीसा’चे विडंबन केले आहे. या विडंबनाचा सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला आहे. लांबा म्हणाल्या, ‘‘जम कुबेर दिगपाल जहाँ ते । कवि ‘कोविंद’ कहि सके कहाँ ते ॥ तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा । राम मिलाय ‘राष्ट्र्रपति पद’ दीन्हा ॥’’

इतर धर्मियांच्या संदर्भात असे लिहिण्याचे धाडस आहे का ? – ‘ट्विटर’वरील प्रतिक्रिया

आमदार अलका लांबा यांनी केलेल्या विधानावर भाविकांकडून ‘ट्विटर’द्वारे जोरदार टीका करण्यात आली. श्याम यांनी ‘लांबा यांनी इतर धर्मियांच्या संदर्भात असे लिहिण्याचे धाडस दाखवण्या’चे आवाहन केले. काहींनी लांबा शब्द मागे घेऊन क्षमा मागण्यास सांगितले. अनेकांनी लांबा यांच्यावर टीका केली आहे.