BREAKING NEWS

flip3

सूचना

'विदर्भ24न्यूज' मधील मजकूर आपण 'Vidarbha24News' च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Wednesday, January 11, 2017

थेट ‘वॉर रुम’मधून मनसे प्रमुख राज ठाकरें यानी जनतेशी संवाद साधला.महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे. आता थेट ‘वॉर रुम’मधून मनसे प्रमुख राज ठाकरें जनतेशी संवाद साधला.
मनसेच्या मुंबई विभागाच्या 'वॉर रूमचे' राज ठाकरेंच्या हस्ते उदघाट्न झाले.
यावेळी फेसबुकच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी LIVE संवाद साधला.
यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उडवत, माध्यम विकली गेली असल्याचा घणाघाती आरोप केला. तसेच
राज ठाकरे LIVE थेट वॉर रुममधून
- सध्या कोणताही पर्याय समोर दिसत नसल्याने स्वबळावरच लढणार असल्याची राज ठाकरेंची घोषणा
- निवडणुकांच्या तोंडावर जातीय विष पसरवले जात आहे.
- संबध तूटले तरी चालतील पण भूमिका बदलणार नाही
- सत्ता उपभोगली मग सेनेच्या भ्रष्टाचारात भाजप सहभागी नाही का?
- भाजपने 30 वर्ष शिवसेनेसह सत्ता उपभोगली
- मला सतत टीव टीव करायला आवडत नाही
- निश्चितच पून्हा एकदा नाशिकमध्ये मनसेची सत्ता आणून दाखवेन
- मनसेने केलेल्या कामाचे कुणाही कौतुक करत नाही
- जेवढे टोल नाके बंद झाले ते फक्त मनसेमुळे बंद झाले
- आमच्या मिरवणुका तुम्ही लगेच बंद करता, मग मुस्लीमांच्या मिरवणुकांना रात्री उशीरा पर्यंत परवानगी कशी मिळते?
- मी हिंदू आहे त्यात गैर काय?
- मी मराठी आहे, हिंदू आहे हे कोणी नाकारणार आहे का?
- नाशिक महापालिकेचं कर्ज फेडून काम केली
- नाशिक इतकी काम दुस-या शहरात झालेली नाहीत
- वर्तमानपत्रे, चॅनल्स विकल्या गेल्यासारखे बातम्या देत आहेत
- ना मी कुणाकडे गेलोय, ना कुणी माझ्याकडे आलेय - युती बाबात राज ठाकरेंची फटकेबाजी
- जे मनसे सोडून जात आहेत त्यांना जाऊदे
- माझ्याकडे उत्तम काम करणारी माणस आहेत.
- माझी अवस्था भाजप पक्षासारखी नाही
- मी टीझर, ट्रेलर टाकत नाही पिक्चर दाखवतो
- शिवसेनेचे काय चालले आहे त्यांच त्यांनाच ठाऊक
- नोटाबंदीनंतर भाजपाकडे नोटा कशा आणि कुठून आल्या.
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची माणस भाजपाच्या चिन्हावर निवडून येतायत

Share this:

Post a Comment

flip4

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.