BREAKING NEWS

flip3

सूचना

'विदर्भ24न्यूज' मधील मजकूर आपण 'Vidarbha24News' च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Monday, January 9, 2017

जिल्हाधिकारी श्री किरणजी गीत्ते यांची भव्य पुस्तकतुला व करीअर मार्गदर्शन सभेचे आयोजन

श्री प्रमोद नैकेले  / अचलपूर / - आज स्पर्धेचे युग महाराष्ट्र लोक सेवा व केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या जुळ्या शहरातील युवाशक्ती ला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे तसेच आपले जिल्हाधिकारी डॉ.किरणजी गीत्ते यांचे पुस्तकप्रेम व स्पर्धा परीक्षा मधील आपुलकी पाहता अचलपूर पुस्तक प्रेमींनी त्यांची भव्य पुस्तकतुला करून करीअर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
  स्पर्धेच्या युगात आपल्या शहरातील युवाशक्ती मागे राहू नये त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे जेथे त्यांना एम.पी.एस.सी.,युपी.एस.सी व स्पर्धा परीक्षेला आवश्यक पुस्तके तसेच वारंवार मार्गदर्शन लाभावे या उद्देशाने व स्वतः अमरावती जिल्ह्याचे आवडते जिल्हाधिकारी डॉ.किरणजी गीत्ते यांच्या प्रेरणेने शहरात सुसज्ज वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचे हेतूने विलास बेलसरे व पुस्तकप्रेमु मित्रमंडळी यांनी ज्ञानप्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय सरमसपुरा स्थापन करण्याचा संकल्प केला आहे या निमित्ताने स्थानीक कल्याण मंडपम येथे १७ जानेवारी २०१७ मंगळवार ला ११ वाजता किरणजी गीत्ते यांची भव्य पुस्तक तुला करून सत्कार व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा तसेच करीअर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी प्रवीण म्हस्के संचालक करिअर मार्गदर्शक संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ व जिल्हाधिकारी किरणजी गीत्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करतील.कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुनिता फीसके,आमदार बच्चू कडू,अ.बा.सूर्यवंशी जिल्हा ग्रंथालय अधिकारी,श्यामकांत म्हस्के स्वीय.सहा.गृहराज्यमंत्री,डाँ.व्यंकटजी राठोड उपविभागीय अधिकारी महसुल,मनोज लोणारकर तहसिलदार,नरेंद्र फिसके माजी उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक,डाँ.मोहन केवाळे शल्यचिकित्सक,गोविंदभाऊ कासट,प्रा.वसंतराव शिरभाते जेष्ठ समाजसेवक प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहेत तेंव्हा शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी या संधिचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे ज्ञानप्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय सरमसपूरा अचलपूर चे संयोजक विलास बेलसरे,केशवराव काळे,अशोक बेंडे,प्राचार्य राजेश चव्हाण,मधुकर राऊत,विनय चतुर,विलास भागवत,नितीन केवाळे,धनंजय लव्हाळे,सुधीर चुनारकर,बंडू काटे,राजेश्वर गोतमारे,प्रमोद हरीमकार,निशांत विखार,अंगद दाभाडे.गजानन जायदे,युवराज परीहार व समस्त पुस्तक प्रेमी मित्रमंडळी यांनी आवाहन केले आहे.

Share this:

Post a Comment

flip4

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.