BREAKING NEWS

flip3

सूचना

'विदर्भ24न्यूज' मधील मजकूर आपण 'Vidarbha24News' च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Thursday, January 5, 2017

शेतकऱ्यांचा आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज - तद्नंतर शेतकऱ्यांनि केली दगडफेक - आमदार बच्चू कडू करणार २ दिवसाचं अन्नत्याग आंदोलन

अमरावती / सुरज देवहाते /--

आपल्या अनोख्या आंदोलनातून नेहमी जनतेच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी आमदार श्री बच्चू भाऊ कडू प्रसिद्ध आहेतच ... अशातच आज अमरावती येथे अनोखे "नांगर आंदोलन" ठेवण्यात आले होते मात्र या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले.


  त्यात झाले असे कि मोर्चा आधी आयुक्त कार्यालयावर जाणार होता पण आचारसंहिता पाहता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर थांबण्यात आला याची माहिती बच्चू कडू यांनी आधीच दिली होती  जेव्हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर आला त्यावेळी शेतकऱ्यांना अडवण्यात आले होते तेव्हा शेतकऱ्यांकडून आम्हाला समोर जाऊ द्या थांबू नका अस पोलिसांना सांगण्यात आले पण पोलिसांनी त्यांना अडवले तद्नंतर त्यांनी पोलिसांनी लावलेले कठडे ढकलण्याचा प्रयत्न केला त्या कठड्यातून एक दोन कार्यकर्त्ये आतमध्ये निसटले त्या नंतर पोलिसांनी त्या दोन जणांवर लाठीचार्ज केला पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले.


 पण कठड्याबाहेर असणाऱ्या महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मग कठडे ढकलून लावण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान पोलिसांनी पाण्याचा मारा , अश्रुधूर व लाठीचार्ज केला  व त्यांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला पण थोडे दूर  शेतकरी गेल्यावर शेतकऱ्यांनी पोलिसांवर प्रत्युत्तर म्हणून दगडफेक केली   यामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज मध्ये ५० च्या आसपास शेतकरी जखमी झाले आहे त्यात महिलांचाही समावेश आहे एक कार्यकर्ता गंभीर जखमी आहे सर्वाना इर्विन येथे बहरती करण्यात आले आहे.


प्रमुख मागण्या म्हणजे

  1. संत्रा ,तूर,सोयाबीन,कापूस धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० रुपये मदत करा 
  2. पिक कर्जाचा रकमेत वाढ करा 
  3. विधवा अपंग व दुर्धर आजार असणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये थेट समविष्ट करावे तसेच अंत्योदय योजने अंतर्गत कार्ड देऊन त्यांचा मानधनात वाढ करावी 
  4. पेरणी ते कापणी ची सर्व कामे MREGS च्या अंतर्गत करावी 
  5. शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग त्वरित लागू करावा 
  6. शेत मजुरांना अपघात व आरोग्य विमा त्वरित द्यावा 
  7.  मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली त्वरित बंद करावी 

Share this:

Post a Comment

flip4

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.