BREAKING NEWS

IPL

सूचना

'विदर्भ24न्यूज' मधील मजकूर आपण 'Vidarbha24News' च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Wednesday, January 11, 2017

मुख्याधिकारी अलोने यांनी घरकुल प्रकरणी दिलेले आश्वासन विरले हवेतच - कारवाईसाठी मागीतलेल्या २ महिन्यानंतरही प्रकरण जैसे थे

चांदुर रेल्वे- (शहेजाद  खान)-


जळगाव सारखा घरकुल घोटाळा स्थानिक नगर परीषदमध्ये झाला असुन हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी व दोषींवर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ अनेक महिन्यांपासुन लढा देत आहे. मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे जवंजाळांनी २ ऑक्टोंबर रोजी जलसमाधीचा इशारा दिला होता. इशाऱ्यानंतर  प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी जवंजाळसोबत चर्चा केल्यानंतर २ महिन्याचा अवधी मागितला होता व कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यामुळे जलसमाधी आंदोलनाला सद्यास स्थगितीचा निर्णय जवंजाळ यांनी घेवुन स्थानिक नगर परीषदला सहकार्य केले होते. मात्र आश्वासनाची पुर्तता अजुनही करण्यात आलेली नाही.
 

चांदुर रेल्वे नगर परीषदमधील घरकुल घोटाळा  अनेक दिवसांपासुन गाजत आहे. घोटाळ्यातील दोषींवर कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ यांनी दोन वेळा उपोषण, आंदोलने केली. याबाबत पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांचे पत्र आले, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले, अहवाल तयार झाला यावरून भ्रष्टाचार असल्याचे सिध्द झाले. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. प्रशासनाविरोधात कोर्टात जायला पैसे नसल्यामुळे व कोर्टात एका प्रकरणाला लागणारा ३-४ वर्षांचा कालावधी यामुळे गौतम जवंजाळ या भ्रष्टाचाराविरोधात २ ऑक्टोंबर रोजी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनातर्फे कारवाई करण्याचे संकेत मिळत होते. प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी जवंजाळ यांच्यासोबत यावर चर्चा केली. स्थानिक न.प. मध्ये बांधकाम अभियंता व तत्कालीन मुख्याधिकारी कार्यमुक्त झाल्यामुळे व न.प. अधिवक्ता यांच्याकडुन मागविण्यात आलेले कायदेशीर मत अप्राप्त आहे. त्यामुळे कारवाई करने शक्य झाले नसुन १६ सप्टेंबर रोजी माझ्याकडे स्थानिक न.प. चा कार्यकाळ सोपविण्यात आला असुन सदर कारवाई प्रक्रीयेसाठी २ महिन्यांचा कालावधी अपेक्षीत असल्याचे मुख्याधिकारी अलोने यांनी सांगितले होते. कालावधी जवंजाळ यांनी मान्य करून जलसमाधीच्या निर्णयाला स्थगीती देवुन नगर परीषदला सहकार्य केले होते. मात्र अपेक्षीत कालावधीपेक्षा २५ दिवस जास्त होऊनही अजुनपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी अलोने यांनी दिलेले आश्वासन सुध्दा हवेतच विरले आहे. या खोट्या आश्वासनाने गौतम जवंजाळ त्रस्त झाले असुन आता पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते. मात्र आता तरी दोषींवर कारवाई होणार की प्रकरण जैसे थे असणार हे पाहणे औचित्याचे राहणार आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो अथवा कोई कॉपीराइट आपत्ति हो तो वह s9421719953@gmail.com / 9421719953 पर संपर्क करें। साथ ही साथ पूरी जानकारी तथ्य के साथ दें। जिससे आलेख को सही किया जा सके या हटाया जा सके

Bulk SMS

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.