BREAKING NEWS

1

1

Saturday, January 21, 2017

शाळेनेही जोपासली माणुसकीची भिंत
वडगावशेरी/---


पुण्यापासून सुरु झालेल्या

"माणुसकीची भिंत" उपक्रम आता शाळेपर्यंत पोहचला .शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. या उद्देशाने शिवराज विद्यालयाने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दर शनिवारी सकाळी शाळा भरल्यानंतर शाळेकडून या भिंतीजवळ ठेवण्यात आलेल्या वस्तुंचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते असे संस्थेचे सचिव गीता साळुंके यांनी सांगितले.

         शाळेच्या भव्य पटांगणावर प्रवेशद्वारा समोरच्या भिंतीला माणुसकीची भिंत म्हणून नामकरण करण्यात आले. ही भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यात आली आहे.

ह्या भिंतीला टेकून टेबल ठेवून आठवड्यातील शनिवारी हा उपक्रम राबविला जातो.या दिवशी येणारे विद्यार्थी आपल्याकडे असलेले अधिकचे साहित्य कँम्पास बाँक्स,वाँटरबँग,पेन,पेन्सिल, पँड,बूट,साँक्स इत्यादी वस्तू टेबलावर आणून ठेवतात. ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्यांची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असतात. ह्या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका अरुणा मोरे,मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे ,विनायक काकडे,गणेश निर्मळ, संजय मोरे, गजेंद्र केदार, अनिल वाळके,शिवाजी पवार, ज्ञानेश्वर भुजबळ प्रयत्नशील असतात.

*संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता समीती कडुन सावर्डी गावची पाहणी*


अमरावती/  savardi/---


सावर्डी येथे नुकतेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभीयान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा.दि.२ऑक्टोंबर ते ३० नोहेंबर राबविण्यात आली.सर्व प्रथम गाडगेबाबाच्या फोटोचे पुजंन करुन गटविकास अधीकारी साहेंबाचे पुष्पगुच्छ देवुन सरपंचानी स्वागत केले. यासमीती मार्फत सावर्डी गावची पाहनी करण्यात आली.
तालुक्यातील पहीले हागणदारीमुक्त गाव,(मॅजीकपीट)शौचखडे व ईलर्नीग डिजीटल शाळा.शासकीय योजना राबविनारे सावर्डी गावाची तपासनी संतगाडगेबाबा स्वच्छता समीती प्रमुख बी.एस.रेगंडे गटविकास अधीकारी अंजनगाव सुर्जी,व भाऊसाहेब अकलाडे गटविकास अधीकारी अमरावती, सरपंच राहुल उके,भोजराज पवार विस्तार अधीकारी(पंचायत) अ.सुर्जी,जितेंद्र देशमुख विस्तार अधीकारी(पंचायत)अमरावती,मडंवे,नांगरे,रुपाली धस्कट,जयश्री चौधरी,उपसरपंच नलीनी मेश्राम,रिता मेश्राम,वैभव खोब्रागडे,सचीव व्ही.बी.गोपाळे, मुख्याध्यापीका प्रणाली अंभ्यकर,संगीता अग्रवाल,सज्जाद अहमद, अंगणवाडी सेवीका सयाबाई मेश्राम,दिनेश खडसे,गजानन लुंगे,विजय मेश्राम सह ग्रामस्थ उपस्थीत होते.

मला 500 व 1000 च्या जुन्या नोटा द्या मी बदलून देतो - रावसाहेब दानवे यांचं वादग्रस्त विधान

दुबळ्या माणसाच्या तोंडी ‘अहिंसा’ हा शब्द शोभत नाही ! – शरद पोंक्षे

निगडी (पुणे)– 
sharad-ponkshe1

स्वतःला प्रथम सामर्थ्यवान बनवा आणि मग अहिंसेच्या गोष्टी करा; कारण दुबळ्या माणसाच्या तोंडी ‘अहिंसा’ शब्द शोभत नाही. शत्रूला त्याने नमवता येत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते आणि शिवसेना उपनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. ते ‘क्रांतीवीर सावरकर विचार मंच’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर हेही उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, देशाच्या सीमा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे तलवारीने आखाव्या लागतात, ‘सुताने’ नव्हे. दुर्दैवाने ७० वर्षांत कुठल्याच राजकीय पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेजारील राष्ट्रातून होणारी घुसखोरी, आतंकवाद आदी अनेक गोष्टी घडत आहेत. हे रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या वेळेला नेहरूंना अनेक पत्रे लिहिली; पण मौजमजेत व्यस्त असणार्‍या नेहरूंना पत्र गांभीर्याने घेण्याची आवश्यकता वाटली नाही. अनेक वर्षांनी हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार आल्यावर हिंदूंच्या आशा पल्लवीत झाल्या; पण त्यांचा प्रवासही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून व्हायला लागला.
उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय लोकांनी आता रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे, नाहीतर आज राम गडकरी यांचा पुतळा फोडला, उद्या अनेक क्रांतीकारकांचे पुतळे फोडतील. आजच्या पिढीला फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती शिकवली जाते अन् आपल्या अतीउच्च ज्ञान असलेल्या हिंदु संस्कृतीपासून लांब ठेवले जाते. त्यामुळे आज विद्यार्थ्यांना हिंदूंच्या शौर्याचा इतिहास शिकवण्याची आवश्यकता आहे, असेही श्री. पोंक्षे म्हणाले.

राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा

  • अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासन स्वतःहून गुन्हे प्रविष्ट का करत नाही ?

  • हिंदु जनजागृती समितीची पंढरपूर (जिल्हा सोलापूर) पोलिसांकडे मागणी

  • हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ अभियान


पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांच्याकडे १७ जानेवारी या दिवशी देण्यात आले. या वेळी पेशवा युवा मंचचे गणेश लंके, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख प्रतापसिंह साळुंखे, सौरभ थिटे-पाटील, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे, विश्‍व हिंदु परिषदेचे रविंद्र साळे सर, रामेश्‍वर कोरे, विश्‍वनाथ मुंढेवाडीकर, बजरंग दल शहरप्रमुख सुनील बाबर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, श्‍लोक पाटील यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

काश्मीरमधून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे ! – रमेश शिवपुरी, काश्मीर हिंदु सभा

पुणे– 

आजची काश्मीरसमस्या ही राजकीय नसून ही दोन धर्मांची लढाई आहे. गेल्या १ सहस्र वर्षांपासून धर्मांधांकडून हिंदूंवर प्रहार होत आहेत. गेल्या ७० वर्षांत हिंदूंना हिंदूंच्याच देशातून विस्थापित व्हावे लागत आहे. आज धर्मांध हे आमच्याच छाताडावर उभे राहून उघडउघड विरोध करत आहेत. त्यामुळे आपल्याला आपला काश्मीर मिळवण्यासाठी तेथून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे, असे परखड प्रतिपादन काश्मीर हिंदु सभेचे माजी अध्यक्ष श्री. रमेश शिवपुरी यांनी केले. ‘पनून कश्मीर’च्या वतीने १९ जानेवारी या दिवशी ‘काश्मिरी हिंदू विस्थापितदिना’च्या निमित्ताने धानोरी (जिल्हा पुणे) येथील काश्मीर भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काश्मीर हिंदु सभेचे अध्यक्ष श्री. जगमोहन कौल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अमर मालमोही, काश्मीर वाहिनीच्या रितु सुंभली, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी, तसेच अनेक काश्मिरी हिंदू उपस्थित होते.
श्री. रमेश शिवपुरी पुढे म्हणाले,
१. धर्मांधांनी हिंदूंना कमकुवत समजू नये. धर्मांधांशी हिंदू गेली १ सहस्र वर्षे लढूनही आज भारतात ८३ टक्के हिंदू आहेत. ही लढाई चालू रहाणार आहे.
२. आपल्यातील काही देशद्रोही ‘जयचंद’ हे आपल्याच देशाचे खाऊन आपल्याच देशाच्या विरोधात काही पैशांसाठी विकले गेले आहेत. अशा ‘आधुनिक जयचंद’ यांना देशातून हाकलले पाहिजे.
३. म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान असते, तर काश्मीरची समस्या राहिलीच नसती.
४. हिंदुस्थान हा देश हिंदूंचा होता, आता आहे आणि पुढेही रहाणारच !

सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

कल्याण –

 मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे. सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी उल्हासनगर येथे वाहिनीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी केले. या वेळी सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. विजय ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. ‘हिंदूंवरील अत्याचारांचे निर्भीड वार्तांकन केवळ सनातन प्रभात करते. मला सनातनच्या आश्रमास भेट देण्यास आवडेल’, असेही मतही श्री. चव्हाणके या वेळी म्हणाले. त्यांना श्री. ठाकरे यांनी दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट दिला.

दोन पोलिसांच्या गटात हाणामारी : दोन पोलीस निलंबित आणि आठ जणांना अटक

पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारा प्रकार

maharashtra_police320
सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले किरण पुजारी आणि संतोष पाटील या दोघा पोलिसांत अन्य एका पोलिसाच्या गाडीवरून वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. उदगाव येथे दोघांचे गुंड समर्थक एकमेकांना भिडले आणि तुफान हाणामारी करण्यात आली. यात तलवार, काठ्या, बांबू यांचा मुक्त वापर करण्यात आला. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे आणि जयसिंगपूर पोलीस ठाणे असे दोन्हीकडे गुन्हे प्रविष्ट झाले असून या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी किरण पुजारी आणि संतोष पाटील या दोघांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे

जी 9 संघाने पटकविले हाफ पिच मॅच चा किताबप्रवीण डोके / पुणे:-


दापोडी येथे पार पडलेल्या भव्य हाफ पिच नाईट मॅच चा किताब खड़की येथील जी 9 संघाने पटकविले आहे , मालिकावीर करण गायकवाड़ याच्या खेळीने प्रेक्षकांना आचंबित केले.
  दापोडी येथे कै.पै.न्या नोबा लक्ष्मण जम यांच्या स्मरणार्थ भव्य नाईट हाफ पिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट सामन्यांमध्ये 24 संघाने सहभाग घेतला होता .
अत्यंत अतितटीच्याअंतिम सामन्यामध्ये  जी9 च्या आरिफ कुरैशी व करण गायकवाड़ याने चांगली खेळी करून संघाला विजयश्री खेचून आणली .संघाचे कर्णधार अमित चौधरी याने चषक व एक लाख पारितोषिक स्वीकारले.

Friday, January 20, 2017

केंद्रीय पथकांकडून शहरात स्वच्छतेची पाहणी महापालिकेतर्फे पथकांतील तिघांचा सत्कार

परभणी  /  मोईन खान /-


परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ संरक्षण 2017 स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे तीन पथकाचे सत्कार महानगरपालिकेच्या वतीने महापौर सौ.संगिताताई वडकर , आयुक्त राहुल रेखावार, अतिरिक्त आयुक्त अजित कारचे, स्थायी समिती सभापती बाळासाहेब बुलबूले, उपायुक्त अनिल गीते, राजेंद्र वडकर, सहाय्यक आयुक्त विजया घाडगे, सय्यद इमरान, धापकर, प्रकाश कुलकर्णी, मिर शाकेर अली, गणेश सुरवसे, नागेश जोशी, बाळासाहेब मोरीर, केशव धोंडे, मिर्झा बेग, डि.बी.देवकर, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, अशोक स्वामी, राजु झोडपे, सुनिल वसमतकर, नागेश जोशी आदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. आयुक्त राहुल रेखावार यांनी शहरातील स्वच्छतेविषयी माहिती पथकाला देण्यात आली. केंद्र शासनाच्या पथकांने दिवसभर शहरात स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी गोरसिया उर्मिश, सितेंद्र त्रिवेदी, जितेंद्र यादव यांनी पाहणी केली. यावेळी श्रीकांत कुरा, राजकुमार जाधव, नागेश जोशी, मेहराज अहेमद, सय्यद इमरान, मिर शाकेर अली आदी पाहणी करतेवेळी होते.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो अथवा कोई कॉपीराइट आपत्ति हो तो वह s9421719953@gmail.com / 9421719953 पर संपर्क करें। साथ ही साथ पूरी जानकारी तथ्य के साथ दें। जिससे आलेख को सही किया जा सके या हटाया जा सके

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.